भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज

aho pandhariraya vinaviton tuj | akhand santaraj lago maj

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥ नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥ पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद । तेणें सर्व बाध हरे माझा ॥३॥ चोखा म्हणे माझा हाचि नवस । पुरवी सावकाश देवराया ॥४॥