भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो निर्विकल्पतरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं

aho nirvikalpataru deva | phalen purava ichchhilin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अहो निर्विकल्पतरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं ॥१॥ तरी दया हो चतुर्भुज । स्वरुप निज निजाचें ॥२॥ करीन पूजा समाधान । निश्चळ मनें आपुलीया ॥३॥ निळा म्हणे आवडी ऐसी । पायांपाशीं जाणविली ॥४॥