भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें

aho karunakara patitapavana | amuchya vachana chitta dyaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहो करुणाकरा पतितपावना । आमुच्या वचना चित्त द्यावें ॥१॥ दिन मी हीन रंकाहुनी रंक । म्हणोनियां देह शरण तुम्हां ॥२॥ आमुचें सांकडें वारुनिया देवा । द्यावी तुम्ही सेवा एका चित्तें ॥३॥ एका जनार्दनीं संकल्प हा दृढ । आतां नाहीं गुढ तुम्हापुढें ॥४॥