भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं

aho dayale dnyanabain | arta majhen tujhya payin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥ इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥ सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥ पूर्व पश्चिम देवस्थान । मध्यें ज्ञानाबाई आपण ॥४॥ ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनीं शरण जाऊं ॥५॥