भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे त्यांचे मनी करावे आगमन

ahe tyanche mani karave agaman

आहे त्यांचे मनी करावे आगमन । घेतील मागून तुजपाशी ॥१॥ तयेवेळी व्हाल तुम्ही बेईमान तुम्ही द्याल काढून संतापाशी ॥२॥ खादल्या पिदल्याचे राखे वा । गुमान तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥ चालविला लळा पुरविली आवड । आता कां दगड जड झालो ॥४॥ कां माझी चिंता सांडिली अनंता । संता लागी देता हरूष वाटे ॥५॥ नामा म्हणे काय करिसी अमंगळ । अडचणी राउळा माजी झाली ॥६॥