भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहर्निशी म्हणतां । तेथें न बाधे काळ सत्ता

aharnishi mhanatan | tethen na badhe kal satta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहर्निशी म्हणतां । तेथें न बाधे काळ सत्ता ॥१॥ वरीष्ठा वरिष्ठ नाम । तिहीं लोकीं तें उत्तम ॥२॥ असो भलते याती । परी मुखीं नाम जपती ॥३॥ वंद्य होती हरिहरां । देवा इंद्रादिकां थोरां ॥४॥ ऐशीं नामीं जयां आवडी । एका जनार्दनीं गोडीं ॥५॥