भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें

ahade pahade ge vavugechi jhagade | nako karun bai atan pahe magen pudhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें ॥१॥ सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग । त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥ वेडया वाकुडया गोठी गे नको काढूं वोठी । ध्यानीं मनीं गीतीं गाई कान्हो जगजेठी ॥३॥ निळा म्हणे निंदास्तुति जयासि समान । त्याचि सवें बोल उणे करिल बहुमान ॥४॥