भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ कां रे भारा वागविसी

aha re pamara mipan phugara | vyartha kan re bhara vagavisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहा रे पामरा मीपण फुगारा । व्यर्थ कां रे भारा वागविसी ॥१॥ शस्त्राचेनि रोम चक्र नोहे अंगा । तया सहस्त्र भगा जाहले देखा ॥२॥ विष अग्नीचेनि मेळे । तया कांहें न पोळे ॥३॥ एका जनार्दनीं मन । देवापायीं केलेंक अर्पण ॥४॥