भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहा रे काया जोडी केली । नर्कासी धाडिलीं उभय कुळें

aha re kaya jodi keli | narkasi dhadilin ubhay kulen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आहा रे काया जोडी केली । नर्कासी धाडिलीं उभय कुळें ॥१॥ उपजतां तुज संतोषले सर्व । बुडविलें नांव त्यांचेही त्वां ॥२॥ असत्याची वाचे सदा राबणुक । चोरी शिनाळिक न संडसी ॥३॥ निळा म्हणे वृथा हाहाभूत जन्म । केला ऐसें अकर्म आचरोनी ॥४॥