भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्निच्या पाठारीं पिके जरी पिक

agnichya patharin pike jari pik

अग्निच्या पाठारीं पिके जरी पिक । तरी ज्ञानी सुखदुःख भोगितील ॥१॥ काळोखामाजी जैसे शून्य हारपे । मायोपाधि लोपे तया ज्ञानी ॥२॥ नक्षत्रांच्या तेजें जरी इंदु पळे । तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठलु राया । घोटुनियां माया राहियला ॥४॥