भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे

agarinche kshir sagarin pail dongari dubhate gayare

आगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे । दोहों जाणे त्याचे दुभतें जेवित्याची मेलि मायरे ॥१॥ कान्हो पाहालेरे कान्हो पाहालेरे नवल विपरित कैसें । जाणत्या नेणत्या झांसा पै चतुरा लागलें पिसें ॥२॥ पाणियानें विस्तव पेटविला । वारियानें लाविली वाती । आपें आप दीप प्रकाशला । तेथें न दिसे दिवस रातीरे ॥३॥ खोकरीं आधन ठेविलें । तेथें न दिसे माझी भाक । इंधनाविण पेटविले । तेथें चुलि नाहीं राख ॥४॥ जाणत्या नेणत्या झांसा । पैल चतुरा बोलिजे ह्याळीं । निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले ढिवर पडिले जाळीं ॥५॥