भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें

agadh tujhin lila akal kaiseni kale | brahma mungi dharuni tujhen svarup sanvalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥ तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥ अंगा देव तुं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥ एका जनार्दनीं सबाह्मभ्यंतरीं नांदे । मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय तें बोधे ॥४॥