भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर

aga pandharinatha tu amache maher

रचनाकार: संत बोधले · अभंग
आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर । पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥ तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती । रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥ तुच आमचे वित्त तूच आमचे गोत। तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥ बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही। प्रीती तुझी पायी बसो माझी ॥४॥