भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें

adinath shankare kela upakar | thevanen nirdhar pragat kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥ तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥ निवृत्तिने गुज सांगितलें ज्ञानदेवा । होतां जो ठेवा गुह्य कांहीं ॥३॥ ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनीं नीट मार्ग सोपा ॥४॥