भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिमध्यअंत तुजमाजि बिंबे

adimadhyaant tujamaji bimbe

आदिमध्यअंत तुजमाजि बिंबे । ब्रह्मीं ब्रह्म थांबे लवण जळीं ॥१॥ तैसें झालें ज्ञाना उन्मनी उलथा । प्रपंच चळथा उडालिया ॥२॥ रिगु निगु काज जालें तुझे घर । अवघाचि संसार कळला आम्हां ॥३॥ गोप्य गुजराज उमजलासे हरि । दिसे अभ्यंतरीं आत्माराम ॥४॥ न दिससि ज्ञाना देहीं तुझ्या राम । घेतला विश्राम ऐसे दिसे ॥५॥ निवृत्ति निवांत समरसें पाहात । अवघाचि दीसत देहीं विदेही ॥६॥