भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि मध्य आंत टाकोनि अवसान

adi madhya ant takoni avasan

आदि मध्य आंत टाकोनि अवसान । करुं हरिध्यान सोहंभावें ॥१॥ दिवसा कामान रात्रीचा बडिवारु । हरिसपरिवारु हरि आम्हां ॥२॥ जातीची विजाती नाहीं पैं कुळधर्म । कुळींचा कुळधर्म हरी आम्हां ॥३॥ ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर । सांगतसे विचार आम्हां तुम्हां ॥४॥