भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पैं पुर्ण मत्स्येंद्रनाथीं

adi guru shankar brahmadnyan khun | banali pain purna matsyendranathin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पैं पुर्ण मत्स्येंद्रनाथीं ॥१॥ मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्माज्ञान त्याला कथियेलें ॥२॥ गोरक्ष संपुर्ण निवेदिलें गहिनी । तेणें निवृत्तिलागुनी उपदेशिलें ॥३॥ निवृत्तिनाथें ज्ञानदेवासी दिधलें । परंपरा आले ऐशा परी ॥४॥ एका जनार्दनीं तयाचा मी दास । उच्छिष्ट कवळास भक्षीतसे ॥५॥