भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि अंतु हरि सर्वां घटीं पूर्ण

adi antu hari sarvan ghatin purna

आदि अंतु हरि सर्वां घटीं पूर्ण । जाणोनि संतजन प्रेमभरित ॥१॥ रामनाम चिर्चे प्रेम वोसंडत । नित्यानित्य तृप्त हरिभक्ती ॥२॥ शांति क्षमा दया सावध पैं चित्तीं । आनंदे डुल्लती सनकादिक ॥३॥ मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी। नित्यता आवडी चरणसेवे ॥४॥