भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां

adhin ghei nirapekshata | tyache charan vandin mathan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आधीं घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥१॥ निरपेक्ष जेथेम घडें । यमकाळ पायी जोडे ॥२॥ निरपेक्षाची आवडी । ब्रह्माज्ञान घाली उडी ॥३॥ निरपेक्षेवांचुन । नाहीं नाहीं रें साधन ॥४॥ एका जनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥