भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये ॥१॥ करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव धरी कां रें साचा । उच्चार करीं नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे कां रे तूं साचें । दोष जातील जन्माचें । संदेह नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव धरुनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्रांप्ती । ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ॥१॥ म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस । प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव भावित भाव भावित भावित निजभाव भावना । निजबोध जालिया कैंची भाव भाविक भावना ॥१॥ भक्ति भावित शक्ति बोधीत शोधीत निजसत्त्व । भक्तिमुक्ति विरहित बोधिते निजसत्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाव लागला भगवंतीं । हरिरुप पवित्र जगतीं । पाहता कर्माकर्म गति । ब्रह्मास्थिति अखंड ॥१॥ भक्ति म्हणे सोहंशक्ति । सांडिं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ति । सर्वाभूतीं भगवंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन ॥१॥ कामक्रोध ज्याचे दमोनियां गेलें । इंद्रियें समरसलीं एकें ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥ न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविक हें संत कृपेचें सागर । उतरती पार भवनदी ॥१॥ तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविका त्या गोपी येतो काकुळती । तुमचेनि विश्रांती मजलागीं ॥१॥ मज निराकारा आकारासी येणें । तुमचें तें ऋण फेडावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें ॥१॥ म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचें । अभाविकां साचें नावडे नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥ हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥ चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ