भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद

viththalare tujhen varnitan gunavad

विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद । विठ्ठलारेदग्ध झालीं पापें ॥१॥ विठ्ठलारे तुझें पाहतां श्रीमुख । विठ्ठलारेसुख झालें नयना ॥२॥ विठ्ठलारे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥३॥ विठ्ठलारे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥४॥ विठ्ठलारे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥५॥