भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी

akaravant murti | jevhan dekhen mi drushti

आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त । श्रुति वाखणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥ म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥