भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठो माझा लेकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा

vitho majha lekuravala | sangen lenkurancha mela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठो माझा लेकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥ निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी ॥२॥ पुढे चाले ज्ञानेश्वर मार्गे मुक्ताई सुंदर ॥ ३॥ गोरा कुंभार मांडिवरी चोखा जीवा बरोबरी ॥४॥ बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी ॥५॥ जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा ॥६॥