भजनी मालिका
← भजनांकडे परत

वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं

varati kara kar donhi | patakache anusandhanin

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
वरती करा कर दोन्ही । पताकाचे अनुसंधानीं ॥ १ ॥ सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरीं ॥ २ ॥ नामा म्हणे गोरोबासी । वरती करावें हस्तासी ॥ ३ ॥ गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचेवरी ॥ ४ ॥