भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां आम्हांसी दरूषण । जालें दुर्लभ भाषण

tumhan amhansi darushan | jalen durlabh bhashan

तुम्हां आम्हांसी दरूषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥ म्हणवुनी करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥२॥ भविष्याचे माथां देह । कोण जाणे होईल काय ॥३॥ म्हणे तुकयाचा बांधव । आमचा तो झाला भाव ॥४॥