भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे

tujashi te bramhadnyan kanhi ahe

रचनाकार: संत संताजी · अभंग
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।। काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे । काय ते अभंग जाणितले ।।२।। घाणाची घेऊनी बैसलासि बुधा । जन्म पाठिमागा का गेला ।।३।। तुका म्हणे सर्व सांग तु मजला । सांगतो तुजला संतु म्हणे ।। ४।।