भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक

tihin talin hechi hak | mhanati pandhara sphatik

तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक । सुखेंचि भीके लाविली ॥१॥ थोटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं । म्हणोनि शहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतीना ॥२॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचुनि दुजा नाइको ॥३॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलसी संपूर्ण । तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥