भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वाळवंटी कथा करी

sumbacha karadoda rakatyachi langoti nama valavanti katha kari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वाळवंटी कथा करी।।१।। ब्रह्मादिक देव येवोनि पाहाती। आनंदें गर्जती जयजयकार ।।२।। जनी म्हणे त्याचें काय वर्णू सुख पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥