भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तन पाजायाशी आली होती ते माउशी

stan pajayashi ali hoti te maushi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
स्तन पाजायाशी आली होती ते माउशी ॥१॥ तिच्या उरावरी लोळे विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥ मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडीं रे अनंता ॥३॥ लिंग देह विरविरलें । जनी म्हणे या विठ्ठलें ॥४॥