भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती

sopanachi aishi murti | vishvakarta bramha mhanati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥ ऐसें बोले पुराणांत । सृष्‍टिकर्ता जो भगवंत ॥२॥ जनी म्हणे हा सोपान । ब्रम्हा अवतरला पूर्ण ॥३॥