भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचितासी दग्ध करी ऐसा कोण

sanchitasi dagdha kari aisa kon

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
संचितासी दग्ध करी ऐसा कोण । सद्‌गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥ यालागीं सद्‌गुरु असावा उत्तम । जेणें निमे श्रम संसाराचा ॥ २ ॥ त्रिविध तापासी कोण करी शांत । सद्‌गुरु एकान्त न जोडतां ॥ ३ ॥ जन्ममरणाची कथा कैं निवारे । सद्‌गुरु निर्धारें न भेटतां ॥ ४ ॥ वासना निःशेष निवारेल तेव्हां । भेटेल तुकोबा सद्‍गुरु तो ॥ ५ ॥ बहिणी म्हणे माझा जाऊं पाहे जीव । का हो न ये कींव तुकोबा ॥ ६ ॥