भजनी मालिका
← भजनांकडे परत

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो

sagun ha ghana gheuni baisalo

रचनाकार: संत संताजी · अभंग
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो । तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।। नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।२।। संतु म्हणे जाती दोनच त्या आहे । स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।३।।