भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार

sadashivacha avatar | svami nivrutti datar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥ महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥ ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥ आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥