भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऋषि म्हणे रे समर्था असो स्वप्नींची हे वार्ता

rushi mhane re samartha aso svapninchi he varta

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऋषि म्हणे रे समर्था असो स्वप्नींची हे वार्ता ।।१।। इच्छा धरून आलों येथे और तुक दे कनकार्ते॥२॥ कृपा करून द्याल जरी उदक घालीं माझे करीं ॥३॥ दया करा आम्हांवरी। आलें पाहिजे नगरीं।।४।। येथें संकल्पावांचून नाहीं होत माझें येणें ||५|| रायें घेऊनी जीवन ऋषिस्तकीं घालून ||६|| विश्वामित्र शिबिकासनीं । राव चालिला घेऊनी ।।७।। मार्गी वाद्यांचा लाघव अयोध्येसी आला राव ॥८॥ राव प्रवेशला नगरीं । विश्वामित्र बैसला द्वारी ।।९।। दंड पडताळूनि हातीं । लक्षियेली तारामती ।।१०।। उभी थरथरां कांपत राजा जाणविली मात ।।११।। राव म्हणे ऋषेश्वर। कोण्या अन्यायानें मार||१२|| केला संकल्प आम्हांसी । नाहीं दिलें दक्षणेसी ||१३|| दान न देता आम्हांसी । तूं कां गेलासी सदनासी ।।१४।। हात बांधोनियां राया। दंडहस्ते मारी तथा ।।१५।। तंव आला रोहिदास चरणीं ठेवी मस्तकास||१६|| येरु रक्तांवर नयन। पुसे कवणाचा कवण ।।१७।। राव म्हणे कुळभूषण आहे आमुचा नंदन।।१८।। राजा पाचारी भांडारी आणा कनकातें झडकरी ।। १९।। मज दिलें राज्यदान । तेंचि घेसी तूं परतोन ॥ २०॥ छत्र मुद्रा सिंहासन। ऋषि हस्तकीं वोपून ।।२१।। हैं तो आलें राज्यदानें और भार कनक देणें ||२२|| धनवंत सौदागर उभे रायाचे समोर ।।२३।। धन देतो जी अपार सोडा रायाला सत्वर ।। २४ ।। विश्वामित्र म्हणे त्यांसी । काय करावें द्रव्यासी।।२५।। क्षितिवरी जितके धन तेहि माझेच संपूर्ण ।। २६ ।। नाहीं कोणाचा उपाव । जनी म्हणे रक्षील देव ||२७||