भजनी मालिका
← भजनांकडे परत

रत्नाचे मंचकी पहले चक्रपाणी चोळीत रुक्मिणी चरणांबुज

ratnache manchaki pahale chakrapani cholit rukmini charanambuj

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
रत्नाचे मंचकी पहले चक्रपाणी चोळीत रुक्मिणी चरणांबुज ।।१।। कानीं पडियेले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥ २॥ रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्ट पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥ टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माया धांविन्नली ॥४॥