भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें

rajayogenvin na kale brahmadnyanen

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें । प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥ पाहोनियां ग्रंथ केलिया ते खुण । न लमें दिल्या प्राण अनंतजन्में ॥२॥ व्रते तपें नेम केलियां पठण । प्रतिमा पाषाण पुजिलियां ॥३॥ न लभे जनघमें मत अभिमानें । तीर्थ उद्यापनें लक्षकोटी ॥४॥ पढों नये ग्रंथ त्यागावा कुळधर्म । न घ्यावें जनकर्म उदाहरण ॥५॥ सेवावें उच्छिष्ठ निर्माल्य गुरुतीर्थ । ऐको नये मात कवणांची ॥६॥ न करतां ग्रहण सेवों नये काहीं । अर्पावें सकळही श्रीगुरुसी ॥७॥ मानों नयें विटाळ राहों भलतें स्थिती । स्पशें दग्ध होती पापें सर्व ॥८॥ जोडती ते मेरू पुण्याचें अगणीत । पावन समस्त श्रीगुरुचेनी ॥९॥ दर्शन पूजन गुरुशेषेंवीण । सेवन ग्रहण पातकची ॥१०॥ गुरुच्या अमक्तांचें वर्जावें दर्शन । निश्चयें पतन तयासंगें ॥११॥ पाहों नये शास्तरें पुराणें चरित्रें । करावीं गुरुशास्त्रें पठण नित्य ॥१२॥ नलगे स्मार्त शैव वैष्णवादि मत । मेदाभेद व्यर्थ तर्कवाद ॥१३॥ संती सांगितलें तेचि आचरावें । व्हावें निज वैष्णवे ज्ञानें निज ॥१४॥ घेवों नयें तर्क दोषादि कल्पना । विचार वल्गना वाद शंका ॥१५॥ असो मलतैसे निंद्यही का नीच । परी योग्य तेंच करावयां ॥१६॥ श्रीगुरुंचे दास जगीं म्हणवावें । नाडले थोर थोर गर्वे अभिमानें ॥१७॥ म्हणें जनार्दन हे तें व्यर्थ आटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१८॥