भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका

pashan viththal svapnantil tuka

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥ घेईन उदंड सेवासुख देहीं । साक्ष या विदेही आहे मज ॥ २ ॥ भ्रताराची सेवा पतिव्रता करी । तरी ती उद्धरी उभय कुळें ॥ ३ ॥ बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांति । भ्रतारें समाप्ती जन्ममृत्यु ॥ ४ ॥