भजनी मालिका
← भजनांकडे परत

परधन कामिनी समूळ नाणीं मना नाहीं हे वासना माया केली

paradhan kamini samul nanin mana nahin he vasana maya keli

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
परधन कामिनी समूळ नाणीं मना नाहीं हे वासना माया केली ॥१॥ तृष्णाहेअधमनव्हावीमजला । प्रेमाचाजिव्हाळादेईतुझ्या||२|| निरपेक्ष वासना दे गा मज सेवा । आणि तुझी सेवा आवडीची ॥३॥ शांतीची भूषणें मिरविती अंगीं । वैष्णव आणि योगी म्हणावे ते।।४।। असो तो अकुळी असो भलते याती । माथां वंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥