भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरीं

pandharicha varakari tyache pay majhe shirin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरीं ।।१।। हो कां उत्तम चांडाळ पायीं ठेवीन कपाळ ॥२॥ वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषीश्वरा ||३|| मुखीं नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥