भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओले मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर

ole mruttikechen mandir | ant sahajan undir

ओले मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर । गुंफा करिताती पोखर । त्याचा नका करूं आंगीकार गा ॥१॥ वासुदेव करितो फेरा । तूं अद्यापी कां निदसूरा । सावध होईरे गव्हारा । भज भज का सांरगधरा ॥२॥ बा तुझें तूं सोईरे । तूंची वडिल पैं बाघारे । तूं तुझेनी आधारें । वरकड मिनले ते अवघे चोर गा ॥३॥ वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो । हा दुर्लभ मानव देह वो । तुकयाबंधु स्वहित लवलाहो गा ॥४॥