भजनी मालिका
← भजनांकडे परत

निनांव हें तुला । नावं साजे रे विठ्ठला

ninanv hen tula | navan saje re viththala

निनांव हें तुला । नावं साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥ कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥२॥ मुद्राधारण माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं फाशांचें गुंडाळें । कोण चाळे गुहस्था हे ॥३॥ तुकयाबंधु म्हणे मिस्कीन । करितोसी देखोन । पाहा दुरीवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥४॥