भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी

narad sange mrutyulokin| harishchandra punyashloki

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ।।१।। कैसा सत्त्वाचा समुद्र। ऐसा नाहीं नृपवर ||२|| नारदाची ऐकून गोष्ट । सुखावला तो वसिष्ठ।।३।। कोप विश्वामित्रा आला। कैसा वाढविता शिष्याला ॥१४॥ तपतेजें सूर्यराशी छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥ उदय पश्चिमे दिनकर। सत्त्व डाळीना नृपवर ||६|| वसिष्ठाच्या ऐकुनी बोला। विश्वामित्रा क्रोध आला ||७|| जरी उतरेल माझ्या तुर्की देईन आपुल्या तपासी ||८|| ऐसा दोघांचा संवाद होता उठला नारद ||९|| इंद्र म्हणे कां निर्फळ शब्दाशब्दी वाढेल कळ ||१०|| ऐसें ऐकतां वचन जनी म्हणे केलें गमन ।।११।।