भजनी मालिका
← भजनांकडे परत

नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख

namratevin yogyata miraviti te kevin pavati brahmasukh

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख ।। १ ।। लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवी पावती केशवातें ||२|| एक संत म्हणविती न हिंडती। अंतरीची स्थिति खबर।।३॥ झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ।।४।। सागरी गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनियां तियेसी नाम नाहीं ॥५॥ नामयाची जनी निर्गुणी बोधिली ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥