भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं

namachiya balen na bhiun sarvatha | kalikalachya matha sote marun

रचनाकार: संत सावता · अभंग
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥ सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ ३ ॥ सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥ ४ ॥