भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी

nama aisen nam tujhiya svarupa | avaran arupa kon thevi

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥ तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥ याही शब्दामाजी वाचा न लागे । मार्ग पैं गा लागे निर्धारिता ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा । चिद्रूप अवघा दिससी साच ॥ ४ ॥