भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची

nako tujhen dnyan nako tujha man | majhen ahe man vegalechi

रचनाकार: संत सावता · अभंग
नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥ नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥ चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥