भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं आकाश घडणी। पाहा स्वरूपाची खाणी

nahin akash ghadani| paha svarupachi khani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाहीं आकाश घडणी। पाहा स्वरूपाची खाणी ||१|| स्वरूप हैं अगोचर। गुरु करिती गोचर ||२|| गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ||३|| नाहीं हात पाय त्यासी जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥