भजनी मालिका
← भजनांकडे परत

न बोलवे शब्द अंतरींचा धावा

na bolave shabda antarincha dhava

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
न बोलवे शब्द अंतरींचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥ अदृष्ट करंटें साह्य न हो देव । अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥ तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत । घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥ महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥ अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत । जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥ बहिणी म्हणे मीच असेन अपराधी । अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥