भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं

mulasthal jyachen gomatiche tirin

मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥ ऐसें हें कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नहीं दुजा ॥२॥ वैष्णव हे हेर तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥३॥ तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास । तेणेंच आम्हांस नागविलें ॥४॥