भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना

mukiya sakhar chakhaya didhali | bolatan he boli bolavena

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥ तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥ आनंदी आनंद गिळूनि राहणें । अखंडित होणें न होतिया ॥ ३ ॥ म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें । जग हें करणें शहाणें बापा ॥ ४ ॥